मैत्री'च्या काही स्वयंसेवकांनी मेळघाटमध्ये एक शैक्षणिक प्रयोग करून बघायचं ठरवलं. दिवसाची शाळा हा तो प्रयोग. डिसेंबरमध्ये सुरू झालेली ही शाळा या महिन्यात पूर्ण होत आहे. शाळेचा हा नमुना म्हणजे अनेक दुर्गम आदिवासी भाग, ऊसतोडणी मजूर अशा स्थलांतरित गटांतील मुलांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग आहे.

क्यों झुनकी, आज स्कूल नहीं गयी?
हाव ..... नहीं जाती ।
क्यों नहीं जाती?
मॉं-आबा खेत जाते । मैं आटा बनाती । झीमाय को संभालती । स्कूल में जाती है तो ये करना नहीं होता ।
बाबा ने स्कूल भेजा तो जायेगी क्या ?
हॉं........
चंदू झुनकीला विचारत होता. झुनकी मधेच गप्प बसत होती. दोन-तीन वेळा तोच प्रश्न विचारल्यावर एक-दोन शब्दांत उत्तर देत होती.
मेळघाटमधे गावागावांमधून अशी अनेक शालाबाह्य मुलं दिसतात.
चंदू! मेळघाटमध्ये गेली काही वर्षं राहून गावागावांत काम करणारा "मैत्री'चा कार्यकर्ता.
"मैत्री' ही पुण्यात असणारी सजग व कृतिशील नागरिकांची एक संघटना. "मेळघाट मित्र' हा "मैत्री'चाच एक उपक्रम. मेळघाटात होणारं कुपोषण आणि बालमृत्यू या विषयावर वर्तमानपत्रांतून सतत चर्चेचा धुरळा उडत असतो. कधी मेळघाटला "महाराष्ट्राचा सोमालिया'ही म्हटलं जातं. पण बालकाचा मृत्यू ओढवून आणणारं कुपोषण ही काही मेळघाटची एकमेव समस्या नाही. किंबहुना ज्या इतर समस्यांमुळे कुपोषण आणि बालमृत्यू ओढवत आहेत त्यातील एक समस्या म्हणजे तेथील दुर्लक्षित शिक्षणसुविधा.
औपचारिक शिक्षण महत्त्वाचं आहेच; पण ते अनौपचारिक पद्धतीने देण्यात यावं, ते जीवनाभिमुख असावं, तसंच त्यात आरोग्यशिक्षण, जीवनकौशल्य यांचाही अंतर्भाव व्हावा याबद्दल बुद्धिजीवी वर्गात सतत चर्चा होत असते, आणि आता हे सर्वमान्यच आहे. पण मेळघाटचा विचार करता तिथल्या कोरकूंचं जीवनच शिक्षणाभिमुख नाही तर या नव्या विचारांचा अंतर्भाव तिथल्या शिक्षणात कुठून असणार?
शाळा आहे पण शिक्षण नाही
मेळघाटातील कोरकूंमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने सर्व गावांतल्या सरकारी शाळांमधे शिक्षक आहेत ते बाहेरचेच. हा प्रदेश दुर्गम असल्याने प्रशासनाकडून बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेला. त्यामुळे शाळा नियमित भरवणं, मुलांना शाळेपर्यंत आणणं, त्यासाठी त्यांच्या पालकांशी संवाद साधणं, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरात कोरकू आणि व्यवहारात हिंदी भाषा वापरणाऱ्या मुलांना मराठीतून समजेल आणि आवडेल अशा पद्धतीने शिक्षण देण्याचे कष्ट मेळघाटमधले शिक्षक अभावानेच घेताना दिसतात. त्यामुळे गावागावांत शाळेच्या इमारती आहेत पण त्यात शिकणारी मुलं नाहीत, असं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतं. गेली काही वर्षं "मैत्री'ने तिथल्याच थोडंफार शिकलेल्या तरुणांच्या मदतीने प्राथमिक गटातील मुलांसाठी अभ्यासवर्ग चालवले; तरीही शिक्षणाच्या बाबतीत मुलांमधील बदलाचा वेग फारच मंद होता. त्यामुळे मुलांना नेमकं कसं शिकवावं, जन्मत:च तीव्र कुपोषणाची पार्श्वभूमी असलेल्या या मुलांच्या शैक्षणिक क्षमता व त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं कशी विकसित करावी हे समजून घेण्यासाठी "मैत्री'च्या काही स्वयंसेवकांनी तिथे एक शैक्षणिक प्रयोग करून बघायचं ठरवलं. दिवसांची शाळा हा तो प्रयोग. डिसेंबर ते मार्च या काळात ही शाळा इथे सुरू आहे. हा नमुना अनेक दुर्गम आदिवासी भाग, ऊसतोडणी मजूर, वीटभट्ट्यांवरील मजूर अशा स्थलांतरित गटांतील मुलांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग आहे.

दिवसाची शाळा मेळघाटमध्ये चिलाटी या दुर्गम गावात डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ही शाळा सेतू शाळा असावी, हाच उद्देश ही शाळा भरवण्यामागे होता. म्हणजेच कधी काळी शाळेत दाखल झालेली व काही कारणाने शाळा सोडलेली मुलं पुन्हा शाळेत जाती करावी, त्यासाठी त्यांच्या वयाला योग्य अशी अभ्यासक्षमता व कौशल्यं त्यांना शिकवावीत व जूनमधे त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता यावा, हा या शाळेचा उद्देश होता. म्हणूनच फक्त शालाबाह्य मुलांचाच या शाळेसाठी विचार होत होता. तरीही शाळेत नाव दाखल असलेली बरीच मुलं शिक्षकांच्या अनास्थेमुळे शाळेत जातच नव्हती. त्यामुळे "मैत्री'चे कार्यकर्ते गावागावांत फिरत असताना तिथल्या काही शिक्षकांनी या कार्यकर्त्यांना मुद्दाम भेटून अमुक अमुक माझ्या शाळेत आहे, त्याला मी पुन्हा बोलावणार आहे, असं सांगितलं. आम्ही खजीलच झालो. चला, या कामाच्या नुसत्या नांदीनेच असेही काही परिणाम होतायत तर! त्याचबरोबर "खुशाल घेऊन जा मुलांना. परीक्षेला तर माझ्याच शाळेतून बसवाल ना?' असं विचारून "तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही' असा उद्दाम संदेश देणाराही एखादा भेटला.
शिक्षणाचा सेतू.... त्यात अनेकांचा खारीचा वाटा
मुलांना पुन्हा शिकण्यासाठी यायला तयार करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांच्या पालकांची संमती मिळवणंही तेवढंच महत्वाचं होतं. पालकांना हर प्रकारे समजावून मुलांना शाळेकडे पुन्हा वळवणं सोपं नव्हतं. काहीजणांना गुटखा, लालू मंजन (तंबाखूचं दंतमंजन) वापरण्याची सवय लागली होती. त्यामुळेच ही निवासी शाळा चालवणं हे केवढं आव्हान आहे याची कल्पना शाळेसाठीच्या पूर्वतयारीच्या वेळीच येत गेली.
डिसेंबर महिना, कडाक्याची थंडी. मुलांची घरं मातीची असल्याने थंडीतही ती उबदार राहतात. शाळेत एवढ्या मुलांसाठी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काय करता येईल, हा विचार करून शाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना आवाहन केलं आणि भरपूर गोधड्या, रजया आणि कानटोप्या जमा झाल्या. शाळेसाठी किंवा सर्वांना तिथे स्वयंपाक करण्यासाठी मिक्सरसारखी उपकरणंही काहींनी दिली. इथे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना ह्या यंत्राचं कोण अप्रूप वाटलं! काही मिनिटांत सगळं बारीक कसं होतंय याचं आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावरून हटत नव्हतं. (चिलाटीत अजूनही वीज नाही; पण हा मिक्सर सौर ऊर्जेवर चालवला जातोय. काही वर्षांपूर्वी कोलंबिया युनिव्हर्सिटीतील "इंजिनियर्स विदाऊट बॉर्डर्स'चा स्वयंसेवक पीटर याच्या प्रयत्नांतून चिलाटीत "मैत्री'च्या कार्यालयात व परिसरात सौर विद्युतीकरण करण्यात आलं. त्यामुळे तिथे आता सर्व खोल्या व अंगणात विद्युतदिवे तर आहेतच, पण दूरदर्शन संच व संगणकही चालतो. बी. एस. एन. एल.ची तरंग सेवा तिथे मिळाल्याने इंटरनेटही उपलब्ध आहे.)
या शाळेत मुलं उत्साहाने शिकत आहेत, चित्रं काढत आहेत, कागदाच्या व मातीच्या वस्तू करत आहेत. तरीही हे काम जितक्या सहज हे वाचलं जातंय तेवढ्या सहजपणे झालेलं नाही. त्यासाठी अनेकांना दिवस-रात्र कष्ट घ्यावे लागले आहेत. मुलं इथे राहायला आली. घरापासून पहिल्यांदाच दूर राहिलेली. रानोमाळ भटकायची सवय असलेली. सारं काही आवडलं तरी घरच्या आठवणींनी सुरुवातीला काहीजणांना बैचेन केलंच. मग गुपचूप घरी जायचा प्रयत्नही एकाच गावच्या काहीजणींनी मिळून केला. जंगलाचं, अंधाराचं भय त्यांना कधीच नव्हतं. मध्यरात्रीच हा गट जायला निघाला. रात्री साडेबारा वाजता "मैत्री'चे कार्यकर्ते त्यांना शोधत निघाले आणि पंधरा मिनिटांत त्यांना घेऊन परत आले. दोन वेळा असं झालं. पण मग मात्र यांना आपली खरोखरीच काळजी आहे हे त्या मुलींना पटलं. त्यानंतर शाळा सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही.
शाळा सुरू झाली आणि काही दिवसांतच एक वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. परतवाडा हे मेळघाटच्या जवळचं शहर. इथूनच चिलाटीला जायला दिवसातून केवळ दोनच एस.टी. बसेस आहेत. परतवाडा ते चिलाटी अंतर अतिशय वळणा-वळणांच्या घाटाचं. व्याघ्र प्रकल्पातून जाणारा हा रस्ता फारच खराब. त्यामुळे परतवाडा-चिलाटीला जोडणाऱ्या बसेसच अनिश्चित काळासाठी बंद झाल्या. चिलाटी आणि आजूबाजूच्या गावांचा परतवाड्याशी संपर्कच तुटला. स्वयंसेवक, साहित्य, शिधा .. यामुळे शाळेत जायचा प्रश्न निर्माण झाला. काही दिवसांनी गावकऱ्यांनी आंदोलन करून एस. टी. सुरू केली. असे अनेक छोटे-मोठे प्रसंग.....
पण हे सारे त्रास विसरायला लावणारी, आपल्या कामाला गावकऱ्यांनी दिलेली दादही मिळतेच. चिलाटीमधल्या सुमनबाईंनी मुलांचं कौतुक केलंच, पण तिथेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाला "अरे, आमचीच मुलं या शाळेत दीडच महिन्यात एवढं काही शिकली- तुझ्याकडे का नाही रे शिकत?' असा खडा सवाल सर्वांदेखत केला.
मुख्य म्हणजे शाळेत शिकणे ही गंमत आहे हे मुलांना समजलंय. तसंच, आपला परिसर स्वच्छ कसा ठेवायचा, स्वत: कसं नीटनेटकं आणि स्वच्छ राहायचं, आपला फाटलेला कपडा आणि तुटलेलं बटण कसं शिवायचं हेही ती शिकलीयत. जवळजवळ सर्वच मुलांसाठी दिवसाचं असं एक वेळापत्रक आखून त्याप्रमाणे कामं करणं असं पहिल्यांदाच घडत होतं. खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायला आणि अनोळखी लोकांशीही धीटपणे बोलायला ती शिकली. शाळेत रोजच असणाऱ्या सर्जनशील कृतीच्या सत्रातून त्यांच्यात उपजतच असणाऱ्या चित्रकला, मातीकाम अशा कलागुणांचा आविष्कार होत होता.
या मुलांना शिकण्यासाठी फक्त शिक्षकांची गरज नाही तर प्रेमाची खूप जास्त गरज आहे असं जाऊन आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला जाणवलंय. कोरकू फारसं बोलत नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हीच मुलं प्रेमाच्या चार शब्दांनी आणि एका स्पर्शाने कशी मोकळी होतात, खुलतात हे या स्वयंसेवकांनी पाहिलंय. लहान मुलांना शिकवायला गेलो आणि आम्हीच खूप शिकलो, हा अनुभव प्रत्येकच स्वयंसेवकाचा होता.
मुलं नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक आहेत. पालकांनाही त्यांना शिकवायचं आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर गेलेली मुलं दीड दिवसाच्या सुट्टीनंतर स्वतःहून, खुषीत पुन्हा शाळेत दाखल होत होती. त्यांच्या या उत्साहाला तेवढाच उत्साही प्रतिसाद देणं ही आता आपली जबाबदारी आहे.
दिवसाची शाळा तर संपली, पण शिक्षणाची ही गाडी खीळ न पडता चालू राहील यासाठी अजूनही काही दिवस काम करत राहायची गरज आहे. त्यासाठी तिथे जाऊन या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांनी पुढे यायला हवं आहे. त्यासाठी काही प्रमाणात निधीही उभा करावा लागेल.
मेळघाटातील कोरकू शांतपणे आपलं जीवन जगत होता. आता रोजगारासाठी किंवा अन्य कुठल्याही कारणांनी मेळघाटबाहेरच्या जगाशी संपर्क आल्यावर त्या शहरी झगमगाटाकडे आकर्षित होणं साहजिक आहे. शिक्षणाशिवाय या साधनांचा विवेकशून्य वापर कोरकूंचं जीवन आगीतून काढून फुफाट्यात टाकणारं ठरेल. म्हणूनच शाळा सुटली तरी पाटी फुटून जीवनशिक्षणही थांबू नये म्हणून आपण हे प्रयत्न जोरकसपणे करायलाच हवेत.
("मैत्री'विषयी जास्त माहितीसाठी www.maitripune.net ही वेबसाइट वर पाहावी.)
शाळा सुरू झाली आणि काही दिवसांतच एक वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. परतवाडा-चिलाटीला जोडणाऱ्या बसेसच अनिश्चित काळासाठी बंद झाल्या. चिलाटी आणि आजूबाजूच्या गावांचा परतवाड्याशी संपर्कच तुटला. स्वयंसेवक, साहित्य, शिधा .. यामुळे शाळेत जायचा प्रश्न निर्माण झाला.
दिवसाची शाळा तर संपली, पण शिक्षणाची ही गाडी खीळ न पडता चालू राहील यासाठी अजूनही काही दिवस काम करत राहायची गरज आहे. त्यासाठी तिथे जाऊन या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांनी पुढे यायला हवं आहे.
क्यों झुनकी, आज स्कूल नहीं गयी?
हाव ..... नहीं जाती ।
क्यों नहीं जाती?
मॉं-आबा खेत जाते । मैं आटा बनाती । झीमाय को संभालती । स्कूल में जाती है तो ये करना नहीं होता ।
बाबा ने स्कूल भेजा तो जायेगी क्या ?
हॉं........
चंदू झुनकीला विचारत होता. झुनकी मधेच गप्प बसत होती. दोन-तीन वेळा तोच प्रश्न विचारल्यावर एक-दोन शब्दांत उत्तर देत होती.
मेळघाटमधे गावागावांमधून अशी अनेक शालाबाह्य मुलं दिसतात.
चंदू! मेळघाटमध्ये गेली काही वर्षं राहून गावागावांत काम करणारा "मैत्री'चा कार्यकर्ता.
"मैत्री' ही पुण्यात असणारी सजग व कृतिशील नागरिकांची एक संघटना. "मेळघाट मित्र' हा "मैत्री'चाच एक उपक्रम. मेळघाटात होणारं कुपोषण आणि बालमृत्यू या विषयावर वर्तमानपत्रांतून सतत चर्चेचा धुरळा उडत असतो. कधी मेळघाटला "महाराष्ट्राचा सोमालिया'ही म्हटलं जातं. पण बालकाचा मृत्यू ओढवून आणणारं कुपोषण ही काही मेळघाटची एकमेव समस्या नाही. किंबहुना ज्या इतर समस्यांमुळे कुपोषण आणि बालमृत्यू ओढवत आहेत त्यातील एक समस्या म्हणजे तेथील दुर्लक्षित शिक्षणसुविधा.
औपचारिक शिक्षण महत्त्वाचं आहेच; पण ते अनौपचारिक पद्धतीने देण्यात यावं, ते जीवनाभिमुख असावं, तसंच त्यात आरोग्यशिक्षण, जीवनकौशल्य यांचाही अंतर्भाव व्हावा याबद्दल बुद्धिजीवी वर्गात सतत चर्चा होत असते, आणि आता हे सर्वमान्यच आहे. पण मेळघाटचा विचार करता तिथल्या कोरकूंचं जीवनच शिक्षणाभिमुख नाही तर या नव्या विचारांचा अंतर्भाव तिथल्या शिक्षणात कुठून असणार?
शाळा आहे पण शिक्षण नाही
मेळघाटातील कोरकूंमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने सर्व गावांतल्या सरकारी शाळांमधे शिक्षक आहेत ते बाहेरचेच. हा प्रदेश दुर्गम असल्याने प्रशासनाकडून बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेला. त्यामुळे शाळा नियमित भरवणं, मुलांना शाळेपर्यंत आणणं, त्यासाठी त्यांच्या पालकांशी संवाद साधणं, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरात कोरकू आणि व्यवहारात हिंदी भाषा वापरणाऱ्या मुलांना मराठीतून समजेल आणि आवडेल अशा पद्धतीने शिक्षण देण्याचे कष्ट मेळघाटमधले शिक्षक अभावानेच घेताना दिसतात. त्यामुळे गावागावांत शाळेच्या इमारती आहेत पण त्यात शिकणारी मुलं नाहीत, असं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतं. गेली काही वर्षं "मैत्री'ने तिथल्याच थोडंफार शिकलेल्या तरुणांच्या मदतीने प्राथमिक गटातील मुलांसाठी अभ्यासवर्ग चालवले; तरीही शिक्षणाच्या बाबतीत मुलांमधील बदलाचा वेग फारच मंद होता. त्यामुळे मुलांना नेमकं कसं शिकवावं, जन्मत:च तीव्र कुपोषणाची पार्श्वभूमी असलेल्या या मुलांच्या शैक्षणिक क्षमता व त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं कशी विकसित करावी हे समजून घेण्यासाठी "मैत्री'च्या काही स्वयंसेवकांनी तिथे एक शैक्षणिक प्रयोग करून बघायचं ठरवलं. दिवसांची शाळा हा तो प्रयोग. डिसेंबर ते मार्च या काळात ही शाळा इथे सुरू आहे. हा नमुना अनेक दुर्गम आदिवासी भाग, ऊसतोडणी मजूर, वीटभट्ट्यांवरील मजूर अशा स्थलांतरित गटांतील मुलांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग आहे.
दिवसाची शाळा मेळघाटमध्ये चिलाटी या दुर्गम गावात डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ही शाळा सेतू शाळा असावी, हाच उद्देश ही शाळा भरवण्यामागे होता. म्हणजेच कधी काळी शाळेत दाखल झालेली व काही कारणाने शाळा सोडलेली मुलं पुन्हा शाळेत जाती करावी, त्यासाठी त्यांच्या वयाला योग्य अशी अभ्यासक्षमता व कौशल्यं त्यांना शिकवावीत व जूनमधे त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता यावा, हा या शाळेचा उद्देश होता. म्हणूनच फक्त शालाबाह्य मुलांचाच या शाळेसाठी विचार होत होता. तरीही शाळेत नाव दाखल असलेली बरीच मुलं शिक्षकांच्या अनास्थेमुळे शाळेत जातच नव्हती. त्यामुळे "मैत्री'चे कार्यकर्ते गावागावांत फिरत असताना तिथल्या काही शिक्षकांनी या कार्यकर्त्यांना मुद्दाम भेटून अमुक अमुक माझ्या शाळेत आहे, त्याला मी पुन्हा बोलावणार आहे, असं सांगितलं. आम्ही खजीलच झालो. चला, या कामाच्या नुसत्या नांदीनेच असेही काही परिणाम होतायत तर! त्याचबरोबर "खुशाल घेऊन जा मुलांना. परीक्षेला तर माझ्याच शाळेतून बसवाल ना?' असं विचारून "तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही' असा उद्दाम संदेश देणाराही एखादा भेटला.
शिक्षणाचा सेतू.... त्यात अनेकांचा खारीचा वाटा
डिसेंबर महिना, कडाक्याची थंडी. मुलांची घरं मातीची असल्याने थंडीतही ती उबदार राहतात. शाळेत एवढ्या मुलांसाठी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काय करता येईल, हा विचार करून शाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना आवाहन केलं आणि भरपूर गोधड्या, रजया आणि कानटोप्या जमा झाल्या. शाळेसाठी किंवा सर्वांना तिथे स्वयंपाक करण्यासाठी मिक्सरसारखी उपकरणंही काहींनी दिली. इथे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना ह्या यंत्राचं कोण अप्रूप वाटलं! काही मिनिटांत सगळं बारीक कसं होतंय याचं आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावरून हटत नव्हतं. (चिलाटीत अजूनही वीज नाही; पण हा मिक्सर सौर ऊर्जेवर चालवला जातोय. काही वर्षांपूर्वी कोलंबिया युनिव्हर्सिटीतील "इंजिनियर्स विदाऊट बॉर्डर्स'चा स्वयंसेवक पीटर याच्या प्रयत्नांतून चिलाटीत "मैत्री'च्या कार्यालयात व परिसरात सौर विद्युतीकरण करण्यात आलं. त्यामुळे तिथे आता सर्व खोल्या व अंगणात विद्युतदिवे तर आहेतच, पण दूरदर्शन संच व संगणकही चालतो. बी. एस. एन. एल.ची तरंग सेवा तिथे मिळाल्याने इंटरनेटही उपलब्ध आहे.)
या शाळेत मुलं उत्साहाने शिकत आहेत, चित्रं काढत आहेत, कागदाच्या व मातीच्या वस्तू करत आहेत. तरीही हे काम जितक्या सहज हे वाचलं जातंय तेवढ्या सहजपणे झालेलं नाही. त्यासाठी अनेकांना दिवस-रात्र कष्ट घ्यावे लागले आहेत. मुलं इथे राहायला आली. घरापासून पहिल्यांदाच दूर राहिलेली. रानोमाळ भटकायची सवय असलेली. सारं काही आवडलं तरी घरच्या आठवणींनी सुरुवातीला काहीजणांना बैचेन केलंच. मग गुपचूप घरी जायचा प्रयत्नही एकाच गावच्या काहीजणींनी मिळून केला. जंगलाचं, अंधाराचं भय त्यांना कधीच नव्हतं. मध्यरात्रीच हा गट जायला निघाला. रात्री साडेबारा वाजता "मैत्री'चे कार्यकर्ते त्यांना शोधत निघाले आणि पंधरा मिनिटांत त्यांना घेऊन परत आले. दोन वेळा असं झालं. पण मग मात्र यांना आपली खरोखरीच काळजी आहे हे त्या मुलींना पटलं. त्यानंतर शाळा सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही.
पण हे सारे त्रास विसरायला लावणारी, आपल्या कामाला गावकऱ्यांनी दिलेली दादही मिळतेच. चिलाटीमधल्या सुमनबाईंनी मुलांचं कौतुक केलंच, पण तिथेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाला "अरे, आमचीच मुलं या शाळेत दीडच महिन्यात एवढं काही शिकली- तुझ्याकडे का नाही रे शिकत?' असा खडा सवाल सर्वांदेखत केला.
मुख्य म्हणजे शाळेत शिकणे ही गंमत आहे हे मुलांना समजलंय. तसंच, आपला परिसर स्वच्छ कसा ठेवायचा, स्वत: कसं नीटनेटकं आणि स्वच्छ राहायचं, आपला फाटलेला कपडा आणि तुटलेलं बटण कसं शिवायचं हेही ती शिकलीयत. जवळजवळ सर्वच मुलांसाठी दिवसाचं असं एक वेळापत्रक आखून त्याप्रमाणे कामं करणं असं पहिल्यांदाच घडत होतं. खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायला आणि अनोळखी लोकांशीही धीटपणे बोलायला ती शिकली. शाळेत रोजच असणाऱ्या सर्जनशील कृतीच्या सत्रातून त्यांच्यात उपजतच असणाऱ्या चित्रकला, मातीकाम अशा कलागुणांचा आविष्कार होत होता.
या मुलांना शिकण्यासाठी फक्त शिक्षकांची गरज नाही तर प्रेमाची खूप जास्त गरज आहे असं जाऊन आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला जाणवलंय. कोरकू फारसं बोलत नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हीच मुलं प्रेमाच्या चार शब्दांनी आणि एका स्पर्शाने कशी मोकळी होतात, खुलतात हे या स्वयंसेवकांनी पाहिलंय. लहान मुलांना शिकवायला गेलो आणि आम्हीच खूप शिकलो, हा अनुभव प्रत्येकच स्वयंसेवकाचा होता.
मुलं नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक आहेत. पालकांनाही त्यांना शिकवायचं आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर गेलेली मुलं दीड दिवसाच्या सुट्टीनंतर स्वतःहून, खुषीत पुन्हा शाळेत दाखल होत होती. त्यांच्या या उत्साहाला तेवढाच उत्साही प्रतिसाद देणं ही आता आपली जबाबदारी आहे.
दिवसाची शाळा तर संपली, पण शिक्षणाची ही गाडी खीळ न पडता चालू राहील यासाठी अजूनही काही दिवस काम करत राहायची गरज आहे. त्यासाठी तिथे जाऊन या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांनी पुढे यायला हवं आहे. त्यासाठी काही प्रमाणात निधीही उभा करावा लागेल.
मेळघाटातील कोरकू शांतपणे आपलं जीवन जगत होता. आता रोजगारासाठी किंवा अन्य कुठल्याही कारणांनी मेळघाटबाहेरच्या जगाशी संपर्क आल्यावर त्या शहरी झगमगाटाकडे आकर्षित होणं साहजिक आहे. शिक्षणाशिवाय या साधनांचा विवेकशून्य वापर कोरकूंचं जीवन आगीतून काढून फुफाट्यात टाकणारं ठरेल. म्हणूनच शाळा सुटली तरी पाटी फुटून जीवनशिक्षणही थांबू नये म्हणून आपण हे प्रयत्न जोरकसपणे करायलाच हवेत.
("मैत्री'विषयी जास्त माहितीसाठी www.maitripune.net ही वेबसाइट वर पाहावी.)
शाळा सुरू झाली आणि काही दिवसांतच एक वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. परतवाडा-चिलाटीला जोडणाऱ्या बसेसच अनिश्चित काळासाठी बंद झाल्या. चिलाटी आणि आजूबाजूच्या गावांचा परतवाड्याशी संपर्कच तुटला. स्वयंसेवक, साहित्य, शिधा .. यामुळे शाळेत जायचा प्रश्न निर्माण झाला.
दिवसाची शाळा तर संपली, पण शिक्षणाची ही गाडी खीळ न पडता चालू राहील यासाठी अजूनही काही दिवस काम करत राहायची गरज आहे. त्यासाठी तिथे जाऊन या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांनी पुढे यायला हवं आहे.
No comments:
Post a Comment