धुळे - उन्हाळ्यात उष्माघात, साथरोग आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, आजाराची लक्षणे जाणवल्यास घरगुती व प्रतिबंधात्मक उपाय करावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त हनुमंत भोंगळे, आरोग्य अधिकारी बी. बी. माळी यांनी केले आहे.
यंदाही शहरासह परिसरात तापमानाचा पारा चढता आहे. उन्हात जास्त वेळ फिरल्याने, काम केल्याने उष्माघात होण्याची शक्यता असते. रुग्णाला तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज असते, असे त्यांनी सांगितले.
उष्माघाताची कारणे
उन्हात शेत अथवा इतर मजुरीची कामे अधिक वेळ करणे, कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे,
काच कारखान्यात कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे,
प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या स्थितीशी संबंध येण्यानेही उष्माघात होण्याची शक्यता असते.
रुग्णांना जाणवणारी लक्षणे
थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी.
प्रतिबंधात्मक उपाय
वाढत्या तापमानात कामे टाळावीत, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नये, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे वापरावे
उष्माघातावर उपचार
रुग्णास हवेशीर खोली ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत किंवा वातानुकूलित व्यवस्था असावी. रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
रुग्णास बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, ऑइस पॅक लावावेत.
रुग्णालयात यंत्रणा
शहरातील तापमान वाढण्यास सुरवात झाली असून, उष्माघात कक्ष लवकरच जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. लाळीकर यांनी दिली. उन्हामुळे होणारे आजारांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह औषधीसाठा उपलब्ध होणार आहे.

No comments:
Post a Comment